Homeताज्या बातम्यादेश

नागरिकांनी जनगणना स्वतः करून घ्यावी-ब्राईट सोशल फाउंडेशनचे आवाहन

देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या जनगणना 2027 प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने स्वतः सहभागी होऊन ऑनलाइन पद्धतीने जनगणना पूर्ण करावी, असे आव

’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक
माता-बाल संगोपनात बीड राज्यात अव्वल; मात्र 21 कोटींची माता व बाल संगोपन इमारत अडीच वर्षांपासून धुळखात पडुनपालकमंत्री सुनेत्राताईंनी दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करावे – डॉ. गणेश ढवळे
लक्ष्मीबाई राजळे यांचे निधन


देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या जनगणना 2027 प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने स्वतः सहभागी होऊन ऑनलाइन पद्धतीने जनगणना पूर्ण करावी, असे आवाहन ब्राईट सोशल फाउंडेशन, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या जनगणना मोहिमेअंतर्गत आता नागरिकांना घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. ब्राईट सोशल फाउंडेशनतर्फे शहरातील विविध भागांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करणे, जढझ पडताळणीच्या माध्यमातून माहिती भरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, जनगणनेतून मिळणार्‍या माहितीच्या आधारे शासन शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आदी विविध योजनांचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती भरून जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवणे ही सामाजिक जबाबदारी आहे.  तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा, बनावट संकेतस्थळ किंवा फसव्या लिंकवर विश्वास न ठेवता केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. आपली जनगणना आपणच या संकल्पनेतून नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वतः जनगणना करावी तसेच इतरांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन ब्राईट सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS