Homeताज्या बातम्यापुणे

सुनेच्या हल्ल्यात वृद्ध सासूचा मृत्यू

पुणे: जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सुनेने आपल्या वृ

ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
सोनू कल्याणकर खून प्रकरणाला नवे वळणगोलू मंगनाळेच्या आईसह 5 जणांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी


पुणे: जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सुनेने आपल्या वृद्ध सासूवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.
मृत ज्येष्ठ महिलेचे नाव सुमन अण्णासाहेब शिंदे (वय 82) असे असून त्या आंबेगाव बुद्रुक येथील समृद्धी निवास संकुलात राहत होत्या. अनुपमा संजय शिंदे (वय 60) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंब एकत्र राहत होते. घरगुती कारणांवरून सासू आणि सुनेमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोमवारी घरात पुन्हा वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात अनुपमा शिंदे यांनी स्वयंपाकघरातील धारदार शस्त्राने सासूवर हल्ला केला. घटनेनंतर आरोपी महिलेने स्वतःला घरात बंद करून घेतल्याची माहिती आहे. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडून पाहणी केली असता सुमन शिंदे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. चौकशीदरम्यान अनुपमा शिंदे यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS