Homeताज्या बातम्याबीड

’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक

बीड शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आणि अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आठवले गँ

सोनाराला लुटणार्‍या टोळीवर मिनी मकोका पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची धाडसी कारवाई
धडक देऊन पळून जाणार्‍या वाहनचालकाचा शोध; शिरूर पोलिसांची यशस्वी कारवाई
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी



बीड शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आणि अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आठवले गँगच्या प्रमुख आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. आशिष शामराव आठवले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मकोका प्रकरणात आशिष आठवले हा बराच काळ फरार होता. सतत ठिकाणे बदलत असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील समर्थ बिअर शॉपी येथे त्याने उधारीवर बिअर मागितली. दुकानदाराने उधारी देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या आठवलेने जवळील गावठी पिस्तूलातून गोळीबार केला. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, बीड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि बीड शहर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी कबाडगल्ली परिसरातून मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अंमलदार अश्पाक सय्यद यांनी धाडस दाखवत आरोपीला मिठी मारून पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शीतलकुमार बल्लाळ, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, अंमलदार अश्पाक सय्यद आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे बीड शहरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
———–

COMMENTS