Homeताज्या बातम्याअहमदनगर

‘समता’चा ११२८ कोटी ठेवींचा टप्पा पारवार्षिक सभेत सर्व ठराव मंजूर; १५ टक्के लाभांश थेट खात्यावर जमा

कोपरगाव शहर : गेल्या ४० वर्षांपासून सभासदांचा विश्वास संपादन करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सभासदांनी संस्थेवर ठाम विश्वास व्यक्त केला. स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात झालेल्या या सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा ताळेबंद व नफातोटा पत्रक मांडण्यात आले. यावेळी सर्व सभासदांनी सर्व ठराव हात वर करून मंजुर करण्यात आले.  चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी संस्थेच्या सर्व ठेवी १०० टक्के सुरक्षित असल्याचा विश्वास व्यक्त केला.सभेत मांडण्यात आलेल्या आर्थिक अहवालानुसार, दि. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे ११२८ कोटी रुपयांच्या ठेवी असून ८२४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच संस्थेची सुरक्षित गुंतवणूक ३१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जगातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज योजनेंतर्गत संस्थेने तब्बल ५८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संस्थेला आर्थिक वर्षअखेर १३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समता म्हणजे कुबेराचा खजिना आहे. तो कधीही रिकामा होणार नाही. सभासदांच्या आशीर्वादाने तो आणखी भरत राहील.”मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी वाचून दाखवले. त्यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे समताने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.संचालक संदीप कोयटे यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत खुलासा करत सर्व व्यवहार कायदेशीर असून सभासदांनी विपर्यस्त वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत त्यांनी हात जोडून नतमस्तक होत संचालक मंडळाच्या वतीने सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.सभेदरम्यान अहिल्यानगर शाखेचे सभासद व अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. मंत्री यांनी समताच्या कार्याचे कौतुक केले. “आमचा अनेक वर्षांपासून समता पतसंस्थेवर विश्वास आहे. आमच्या ठेवी सुरक्षित असल्याने आम्ही इतरांनाही समतात ठेवी ठेवण्यास प्रोत्साहित करणार आहोत,” असे ठेवीदार सी. बी. वक्ते यांनी सांगितले.सभेस संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल, जेष्ठ संचालक जितुभाई शहा, संचालक संदीप कोयटे, अशोक दरक, दीपक अग्रवाल, गिरीष सोनेकर, कचरू मोकळ, भरत अजमेरा, चांगदेव शिरोडे, कायदेविषयक सल्लागार विजय गवांदे, टॅक्स सल्लागार दत्तात्रय खेमनर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अरविंद पटेल यांनी मानले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे विकासकामांतील अडथळे दूर : साबळे
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा
oplus_0

COMMENTS