Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

सोन्याची मागणी घटल्यास 1 कोटी रोजगार धोक्यातराजेश रोकडे: सुवर्ण व्यवसाय क्षेत्रातून चिंता व्यक्त

नागपूर : देशहितासाठी काही काळ सोने खरेदी टाळण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन चर्चेत असतानाच, सुवर्ण व्यवसाय क्षेत्रातून त्यावर चि

महागाईचा धक्का टप्प्याटप्प्याने देण्याचे सरकारचे सूत्रगॅस दरवाढीवरून खा. शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
सोने-चांदी आयात शुल्कात वाढकेंद्राचा 15 टक्के शुल्कवाढीचा निर्णय लागू
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा


नागपूर : देशहितासाठी काही काळ सोने खरेदी टाळण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन चर्चेत असतानाच, सुवर्ण व्यवसाय क्षेत्रातून त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्यास या उद्योगाशी संबंधित एक कोटींपेक्षा अधिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केली.
राजेश रोकडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, देशातील सुवर्ण व्यवसायाशी थेट व अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर कामगार, कारागीर, सुवर्णकार, लहान दागिने विक्रेते, वाहतूक व्यवसाय आणि किरकोळ व्यापार जोडलेला आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी अचानक कमी झाल्यास उत्पादन घटून अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या मते, भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही, तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. विवाहसोहळे, धार्मिक उत्सव आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये सोन्याला विशेष स्थान असल्याने सर्वसामान्यांची खरेदी पूर्णपणे थांबवणे व्यवहार्य ठरणार नाही. देशातील नागरिकांकडे सध्या मोठ्या प्रमाणावर सोने साठवलेले असल्याचा अंदाज व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, शासनाने सोने मौद्रिकीकरण योजना अधिक प्रभावीपणे राबविल्यास त्यातून उपलब्ध होणारे सोने देशाच्या गरजा भागवू शकते. उपलब्ध साठ्यातील काही हिस्सा व्यवहारात आला तरी पुढील अनेक वर्षे परदेशातून सोने आयात करण्याची आवश्यकता कमी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी इंधनाचा मर्यादित वापर, परदेश प्रवासात बचत आणि काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. देशाच्या आर्थिक हितासाठी हा विचार महत्त्वाचा असला तरी त्याचे सामाजिक व आर्थिक परिणामही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे रोकडे यांनी स्पष्ट केले. भारत हा जगातील प्रमुख सोने आयातदार देशांपैकी एक मानला जातो. मोठ्या प्रमाणावर होणार्‍या सोने आयातीमुळे परकीय चलनावर ताण निर्माण होऊन व्यापार तूट वाढण्याची शक्यता असते, असेही त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS