Homeताज्या बातम्याबीड

सामाजिक कार्याची दखल; शांताराम गणेश खुडे यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 जाहीर

शिर्डी येथे बी द चेंज फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा 2026 मध्ये सामाजिक कार्यकर्ते शांताराम गणेश खुडे या

पॉलिसीतून साकारले स्वप्नवत लग्न; वधू-वरांसाठी विम्याची अनोखी भेट!गायत्री-आकाश विवाह सोहळा ठरला आर्थिक नियोजनाचा आदर्श; विमा प्रतिनिधी रमेश भोगाडे यांच्या कार्याची दखल
मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुणांसह शाळेत प्रथमनगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार
कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार



शिर्डी येथे बी द चेंज फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा 2026 मध्ये सामाजिक कार्यकर्ते शांताराम गणेश खुडे यांची प्रतिष्ठित महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 17 मे रोजी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शांताराम खुडे यांनी समाजासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, निःस्वार्थ सेवा, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने घेतलेली भूमिका तसेच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. शांताराम खुडे यांनी विविध आंदोलन, निवेदने आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी सातत्याने आवाज उठवला.शांताराम खुडे  यांनी राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत उदुगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचार निर्मुलन  समितीच्या माध्यमातून काही भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई होऊन त्यांचे निलंबन करण्यात आले, तर शहर विकासाच्या कामांमध्ये अनियमितता करणार्‍या काही कंत्राटदारांवरही कारवाई करण्यात यश मिळाले. त्यांच्या या धाडसी आणि जनहिताच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होत असून, अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. यापूर्वीही विविध सामाजिक संस्थांकडून शांताराम खुडे यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे समाजासाठी केलेल्या कामाची खरी पोचपावती ही समाजाकडून मिळणारा सन्मान असतो. मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून, यासाठी बी द चेंज फाउंडेशनचे आयोजक व संपूर्ण टीमचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

COMMENTS