Homeताज्या बातम्यापुणे

पुण्यात एक तरुण २ तास झुलत उभा; शहरात ‘झोंबी ड्रग्ज’चा शिरकाव?

पुणे : शहरातील नरपतगिरी भागात अमली पदार्थांचे सेवन केलेला एक तरुण तब्बल २ तास एकाच ठिकाणी झुलत उभा होता. या तरुणाने 'झोंबी ड्रग्ज' (Zombie Drugs)

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपतची मोठी कारवाई
नसरपूर येथील चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकालाची शक्यता, ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या
पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार
Pune Zombie Drugs: पुण्यात 'झोंबी' ड्रगचा शिरकाव? व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल #pune #zombiedrugs #marathinews #politics #jaimaharashtranews

पुणे : शहरातील नरपतगिरी भागात अमली पदार्थांचे सेवन केलेला एक तरुण तब्बल २ तास एकाच ठिकाणी झुलत उभा होता. या तरुणाने ‘झोंबी ड्रग्ज’ (Zombie Drugs) घेतल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुंबई व उपनगरांत काही दिवसांपूर्वी झोंबी ड्रग्ज घेतलेल्या तरुणांचे काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुणे शहरातही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील नरपतगिरी चौक परिसरात हा तरुण तब्बल २ तास झोंबीसारख्या सुन्न अवस्थेत उभा होता. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, पुण्यात ड्रग्जचा विळखा किती घट्ट होत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

COMMENTS