Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

११ वी प्रवेशासाठी ‘कॅप फेरी’चे वेळापत्रक जाहीर; ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च

अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावामानसतज्ञ व समुपदेशक मनीषा बिक्कड- घुले यांचे प्रतिपादन
महाराणी ताराबाई शाळेतून दहावी बोर्ड परीक्षेत कु.आर्या मुरकुटे 94.40 ड्ढ गुण घेऊन सर्वप्रथम
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार करिअरची निवड होणे आवश्यक-प्रो. डॉ. सतीश दांडगे
Maharashtra 11th Admissions: 7.7 Lakh Registrations Done; Apply Here

मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ८ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आतापर्यंत एकूण ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. या प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी आणि मुलींसाठी विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे.

असे असेल वेळापत्रक:

  • ८ ते २० मे: शून्य फेरी (नोंदणी, भाग-१ भरणे, तात्पुरती गुणवत्ता यादी).
  • २१ आणि २२ मे: नवीन नोंदणी, अर्जात दुरुस्ती आणि भाग-२ (पसंतीक्रम) भरणे.
  • २३ ते २६ मे: अलॉटमेंट प्रक्रिया.
  • २६ मे: पहिली प्रवेश वाटप यादी जाहीर होणार.
  • २६ ते २८ मे: संबंधित महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चित करणे.
  • २९ मे: रिक्त जागांची माहिती प्रसिद्धी.
  • ३० मे: दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर.

विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम देता येणार आहे.

COMMENTS