अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची प्रकृती शुक्रवारी सकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यां
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची प्रकृती शुक्रवारी सकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना पुढील उपचार व वैद्यकीय तपासण्यांसाठी तातडीने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नीलेश लंके गत काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथीलच एका रुग्णालयात मागील 2-3 दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS