Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांगोणी फाटा परिसरात ट्रॅक्टर-बसची भीषण धडक; एकाचा मृत्यू

सोनई : कांगोणी फाटा परिसरात भरधाव ट्रॅक्टरने प्रवासी बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ३ मे रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी गणेश अशोक मुंडे  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रवासी बस रस्त्याने जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने भरधाव वेगात बसला धडक दिली. या धडकेत बसमधील प्रवासी संदीप अशोक मुंडे यांचा मृत्यू झाला. तर सख्खा भाऊ भाऊसाहेब रंभाजी रोकडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेचा पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस करत आहेत.

छत्तीसगडमध्ये वाहन नदीत कोसळून चौघांचा मृत्यू
आजरा येथे भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू
अशोक खरातांचा विश्‍वासू जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू
Indian student dead, 4 people injured in U.K. road accident - The Hindu

सोनई : कांगोणी फाटा परिसरात भरधाव ट्रॅक्टरने प्रवासी बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ३ मे रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी गणेश अशोक मुंडे  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रवासी बस रस्त्याने जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने भरधाव वेगात बसला धडक दिली. या धडकेत बसमधील प्रवासी संदीप अशोक मुंडे यांचा मृत्यू झाला. तर सख्खा भाऊ भाऊसाहेब रंभाजी रोकडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेचा पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस करत आहेत.

COMMENTS