Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नराधम बाप, मामा आणि भावाकडून ५ वर्षांपासून चिमुकलीवर अत्याचार!; पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

कोल्हापूर : माणुसकीला काळिमा फासणारी आणि रक्ताच्या नात्याला लज्जित करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. ज्या पित्याने मुली

महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार-डॉ. रॅपनवाड
सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! हुंड्यासाठी छळ अन् विहिरीत उडी घेऊन शेवट
नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण; एचआरसह सहा जणांना कोठडी
posco act I क्लासला निघालेल्या मुलीवर अत्याचार; काेडाेलीत खळबळ, युवक अटकेत  kolhapur I

कोल्हापूर : माणुसकीला काळिमा फासणारी आणि रक्ताच्या नात्याला लज्जित करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. ज्या पित्याने मुलीचे रक्षण करायचे, त्याच जन्मदात्या पित्यासह मामा आणि मामेभावाने एका अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
कोल्हापूरच्या शाहूपुरी परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलगी जेव्हा केवळ लहान होती, तेव्हापासून नराधम बाप, मामा आणि अल्पवयीन मामेभावाने तिचा शारीरिक छळ सुरू केला होता. घराच्या चार भिंतींच्या आत चाललेला हा अत्याचार गेल्या पाच वर्षांपासून सुरू होता.
वारंवार होणाऱ्या या नराधम कृत्याला पीडिता कंटाळली होती. अखेर, सहनशक्तीचा अंत झाल्यावर तिने आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. पोटच्या गोळ्यासोबत घडलेला हा क्रूर प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. या माऊलीने कोणताही विलंब न लावता थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले आणि या नराधमांविरुद्ध तक्रार दिली.
शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि नराधम पित्यासह मामाला बेड्या ठोकल्या आहेत. रक्ताच्या नात्यानेच केलेल्या या विश्वासघातामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नात्यातील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. नराधम आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता कोल्हापुरातून होत आहे.

COMMENTS