Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंदफणा शाळेचे सीबीएसई रिडिंग चॅलेंजमध्ये सुयश; चार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी

माजलगाव : माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) रिडिंग चॅलेंज 2025-26 या उपक्रमात उ

उमरी/सावंतवाडी प्रीमियर लीगवर ‘यजमान’ उमरी संघाचे वर्चस्व; दहीटना उपविजेता! विष्णुभाऊ घुले यांच्या हस्ते 51,111 चे प्रथम पारितोषिक प्रदान
मोबदला दिल्यानंतरच महामार्गाचे काम करा; शिरूर-बेल्हे महामार्गाबाबत उच्च न्यायालयाचे आदेश
मालेगाव स्फोट प्रकरण: चारही आरोपींची दोषारोप पत्रातून मुक्तता
Sindphana Public School | Majalgaon

माजलगाव : माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) रिडिंग चॅलेंज 2025-26 या उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, आकलनक्षमता वृद्धिंगत करणे तसेच चिकित्सक आणि तर्कशक्ती विकसित करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमात देशभरातील सीबीएसई संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमात कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही विशेष बाब आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 या कालावधीत दोन टप्प्यांत ही स्पर्धा घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात शाळास्तरावर ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. या फेरीत विद्यार्थ्यांच्या वाचनगती, आकलन, विश्लेषण व विचारशक्तीची कसोटी पाहण्यात आली. या फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांची निवड करून दुसर्‍या टप्प्यासाठी नामनिर्देशन करण्यात आले. दुसरी फेरी ही सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पार पडली आहे. सिंदफणा पब्लिक स्कूलच्या पुढील चार विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विशेष प्राविण्य मिळविले आहे- अभिरा रवी देशमुख – इंग्रजी गट यशस्वी लक्ष्मण निंबाळकर – इंग्रजी गट शिवांजली प्रविणकुमार सोळंके – हिंदी गट अंशुमन अविनाश राठोड – हिंदी गट या विद्यार्थ्यांनी दोन्ही टप्प्यात उत्कृष्ट यश मिळवले त्याबद्दल सीबीएसई कडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे . त्यांच्या या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित मानले जात आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाचनातून माहितीचे सखोल विश्लेषण करण्याची, तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची तसेच मजकुराची उपयुक्तता व विश्वासार्हता तपासण्याची संधी मिळते. दुसर्‍या टप्प्यात सहभागी होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना सीबीएसईतर्फे ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र दिले असून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना विशेष प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, उपाध्यक्ष विरेंद्र सोळंके, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य सुवर्णा शिंगणे, सौदागर साखरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यातही अशा शैक्षणिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS