Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नागपूरात IIIT परीक्षेच्या तणावातून कोल्हापूरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

https://www.youtube.com/watch?v=fFOiollUsvc नागपूरच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी'मध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे

नागपूर शहरात आढळला स्फोटकांचा साठा
जुन्या वादातून वळणमध्ये हत्या; राहुरी पोलिसांकडून संशयिताला तात्काळ अटक
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

नागपूरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका २० वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातून अत्यंत वेदनादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
कोल्हापूरचा रहिवासी असलेला श्रेयस माने हा IIIT नागपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सोमवारपासून त्याची चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार होती. मात्र, परीक्षेच्या काही तास आधीच, पहाटेच्या सुमारास श्रेयसने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.
पोलिस तपासात समोर आलेली माहिती पाहून सर्वांचेच काळीज चर्रर्र होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी श्रेयसने स्वत:ला असह्य यातना दिल्या होत्या. त्याने आपल्या दोन्ही हातांच्या नसा कापल्या होत्या. उडी मारताना आवाज येऊ नये म्हणून तोंडात कापड कोंबून त्यावर टेप चिकटवला होता, इतकेच नाही तर नाकातही ‘च्युइंगम’ टाकले होते. या अवस्थेत त्याने मृत्यूला कवटाळले.

COMMENTS