अंबाजोगाई : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या अक्षरगंगा प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षेत योगेश्वरी नूतन विद्यालय (प्राथमिक विभाग), अंबाज
अंबाजोगाई : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या अक्षरगंगा प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षेत योगेश्वरी नूतन विद्यालय (प्राथमिक विभाग), अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्य व जिल्हास्तरावर आपली छाप पाडली आहे.
इयत्ता दुसरीमधून शाळेचा विद्यार्थी चि. श्लोक गिरीश रत्नपारखी याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. स्वरा शिवराम भंडारे हिने राज्यात चौथा क्रमांक मिळवला. तसेच प्रचित विनोद नांदवटे व शशांक वसंत कुंभेफळकर यांनी जिल्ह्यात द्वितीय, रिद्धी सुनील राऊत हिने तृतीय, अंकित हनुमंत सरवदे याने चतुर्थ, तर धनश्री नितीन खोडके व मधुरा राजकुमार साळवी यांनी जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला. याशिवाय केंद्रस्तरावरही अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. यामध्ये शेषराव पांडुरंग चाटे (प्रथम), श्रीशा लक्ष्मण होळकर (तृतीय), स्पृहा श्रीनाथ सावंत (पाचवा), यश नितीन खोडके व शतायु नितीन पाटील (सहावा), आरोही गोविंद चाटे व राजवीर विकास राठोड (सातवा), ईश्वरी संतोष जोशी (आठवा), तसेच प्राची वैजनाथ काळे, श्रवण शिवराज मोरे, श्लोक यशवंत जाधव व मल्हार अर्जुन पेडगावकर (नववा) यांनी क्रमांक मिळवले. इयत्ता पहिलीमधून मनस्वी व्यंकट चव्हाण हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश मिळवले, तर तैमूर शरीफ तांबोळी याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अनविका अशोक दळवे (केंद्रात द्वितीय), ओवी दत्तात्रेय शेप व अपूर्वा गोविंद चाटे (सहावी), समृद्धी मयूर कांबळे (सातवी) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती स्नेहल आडे मॅडम, श्री. शरीफ तांबोळी सर व श्री. मधुकर देवकते सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष गणपत व्यास गुरुजी, कार्यकारी उपाध्यक्ष ड. जगदीश चौसाळकर, सचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य, प्रभारी संचालक पाशुमिया सय्यद, मुख्याध्यापक नांदगावकर सर, विभाग प्रमुख व्यंकटेश चामनर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती मंगल पतंगे व अनंत जोशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या यशामुळे योगेश्वरी नूतन विद्यालयाने पुन्हा एकदा गुणवत्तेचा ठसा उमटवला असून परिसरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS