देवळाली प्रवरा : येथील आंबी स्टोअर रोडवरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शाह दावल मलिक बाबा दर्ग्याचा वार्षिक उरूस उत्सव मंगळवार, दि. ५ मे रोजी उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती दर्ग्याचे सर्वेसर्वा अकील बाबा पटेल यांनी दिली. उरूसानिमित्त विविध तरुण मंडळे, धर्मगुरू, समाजसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत अजमेर (राजस्थान) येथून आणलेली पवित्र चादर मंगळवारी सायंकाळी ७:१५ वाजता दर्ग्यावर अर्पण करण्यात येणार आहे. या दर्ग्याची विशेषता म्हणजे येथे सर्वधर्म समभावाची परंपरा जपली जाते. उत्सवानिमित्त दर्गा परिसरात रात्री ७:३० ते ९:३० या वेळेत लंगर व भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रसिद्ध कव्वाल जलाल अली अजमेरी यांच्या कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे. या उरूस उत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकील बाबा पटेल परिवार व दर्गा खादिम कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

देवळाली प्रवरा : येथील आंबी स्टोअर रोडवरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शाह दावल मलिक बाबा दर्ग्याचा वार्षिक उरूस उत्सव मंगळवार, दि. ५ मे रोजी उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती दर्ग्याचे सर्वेसर्वा अकील बाबा पटेल यांनी दिली.
उरूसानिमित्त विविध तरुण मंडळे, धर्मगुरू, समाजसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत अजमेर (राजस्थान) येथून आणलेली पवित्र चादर मंगळवारी सायंकाळी ७:१५ वाजता दर्ग्यावर अर्पण करण्यात येणार आहे. या दर्ग्याची विशेषता म्हणजे येथे सर्वधर्म समभावाची परंपरा जपली जाते. उत्सवानिमित्त दर्गा परिसरात रात्री ७:३० ते ९:३० या वेळेत लंगर व भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रसिद्ध कव्वाल जलाल अली अजमेरी यांच्या कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे. या उरूस उत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकील बाबा पटेल परिवार व दर्गा खादिम कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS