Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू

अमरावती : एप्रिलच्या अखेरीसच तापमानाने 46 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. या वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फट

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी!
अमरावतीत 180 तरुणी… 350 अश्‍लील व्हिडिओ… आणि ब्लॅकमेलिंगचं मोठं जाळं!
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो? | What is heatstroke and why  does heatstroke cause death mumbai print news amy 95

अमरावती : एप्रिलच्या अखेरीसच तापमानाने 46 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. या वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका बेघर आणि दुर्गम भागात राहणार्‍या नागरिकांना बसत असून, धारणी आणि चिखलदरा तालुक्यांत दोन बेघर व्यक्तींचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
धारणी तालुक्यातील धामणनाला परिसरातील जंगलात, वनखंड क्रमांक 1182 मध्ये सुमारे 35 ते 40 वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. जंगलातून जाणार्‍या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. संबंधित महिला परिसरातील गावांमध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आठवडाभरापूर्वी ती फिरताना दिसल्याचेही सांगण्यात आले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात कोणताही घातपात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पुढील तपास सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील कामापूर शिवारात नणगीटा नाल्याजवळ कडू अर्जुनाच्या झाडाखाली 40 ते 45 वर्षे वयोगटातील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. चिखलदरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी सांगितले की, जिल्हा सामान्य रुग्णालयासह सर्व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरी भागात उपचार सुविधा सहज उपलब्ध होतात; मात्र दुर्गम भागात अशा घटना वेळेवर निदर्शनास येत नसल्याने परिस्थिती गंभीर बनते. सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने उच्चांकी पातळीवर राहत असून, नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

COMMENTS