Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत तीन ग्रामसेवकांचे निलंबन

मुंबई : हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणार्‍या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्य

ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस
शरद पवारांच्या योगदानामुळे रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली
अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज
Hingoli CEO Slams Accounts Officers; Cashbook Probe Deadline

मुंबई : हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणार्‍या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली पंचायत समिती कार्यालयामध्ये मंगळवारी ता 28 बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सूचना देऊनही उपस्थित न राहणार्‍या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS