राहाता : सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या साईयोग फाउंडेशनच्या वतीने राहाता शहर व परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते खटकळी परिसरात १२ फूट उंच वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.संस्थापक अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली साईयोग फाउंडेशन गेल्या १७ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपासून वृक्षारोपण अभियान राबवून हजारो वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले आहे.या कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नगरसेवक पप्पू शेळके, फाउंडेशनचे व्यंकटेश अहिरे, माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर, माजी नगरसेविका डॉ. मंगला गाडेकर, डॉ. निर्मला गाडेकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच वृक्षसंवर्धन क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल प्रभाकर नावकर यांचा सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक करताना ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा मांडला. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना साईयोग फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत राहाता शहरातील हरित क्रांतीत संस्थेचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनीही फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक करत राहाता शहराच्या हरितीकरणासाठी संस्थेचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले.कार्यक्रमास नगरसेवक दशरथ तुपे, ऍड. गोरख दंडवते, मोहन तांबे, भाऊसाहेब बनकर, अरुण मोकळ, विलास वाळेकर, संदीप डांगे, संजय बाबर, रंगनाथ सदाफळ, बबलू फटांगरे, उमेश लुटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ सदस्य रविंद्र धस यांनी मानले.

COMMENTS