Homeताज्या बातम्याअहमदनगर

आले… पाहिलं… अन शुभमंगल सावधान ! चार तासांत लग्नसोहळा; पानसरे-कदम कुटुंबीयांचा आदर्श;आजी-माजी आमदारांची उपस्थिती

श्रीगोंदा : लग्न म्हटले की गडबड, गोंधळ आणि मोठा खर्च हे समीकरण ठरलेले असते. मात्र या प्रथांना छेद देत तालुक्यातील घारगाव येथे पानसरे व कदम कुटुंबीयांनी अवघ्या चार तासांत साध्या पद्धतीने विवाहसोहळा पार पाडत आदर्श निर्माण केला आहे.घारगाव येथील महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांची पुतणी तथा रामदास सखाराम पानसरे यांची कन्या श्वेता आणि पिंपळगाव पिसा येथील सुभाष कदम यांचे चिरंजीव मंगेश यांचा रविवारी (दि. २६ एप्रिल) मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोघांची पसंती झाल्यानंतर सुपारी फोडणे व साखरपुड्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला.दरम्यान, या कार्यक्रमात संतोष खोमणे यांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला. दोन्ही कुटुंबीयांनी त्यास तत्काळ संमती देत तयारीला सुरुवात केली. कुटुंबीयांच्या सहमतीने त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विवाहसोहळा उत्साहात पार पडला.अचानक ठरलेल्या या विवाहासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पाहुणे व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, कुकडी कारखान्याच्या संचालिका प्रणोती जगताप, जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत नलगे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, ह.भ.प. भास्कर महाराज कदम, युवा नेते मयूर पंदरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे स्वागत लालासाहेब पानसरे यांनी केले. साधेपणातून समाजाला संदेश : दत्तात्रय पानसरेकोणत्याही चांगल्या उपक्रमाची सुरुवात कुटुंबापासून व्हावी, या भावनेतून हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने अल्पावधीत पार पाडला. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही अनावश्यक खर्च टाळत छोटेखानी विवाह करण्याचा निर्णय घेतला. समाजातही अशा साध्या पद्धतीने विवाहसोहळे व्हावेत, यासाठी प्रयत्नशील राहू, अशी भावना महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी व्यक्त केली.साधे विवाह काळाची गरज :आ. पाचपुते आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात वेळेचे महत्त्व वाढले आहे. पारंपरिक विवाहसोहळ्यांमध्ये मोठा वेळ आणि खर्च होत असतो. मात्र घारगावातील या उपक्रमातून साधेपणाचा आदर्श समोर आला आहे. अशा पद्धतीने विवाह झाल्यास वेळ आणि पैशाची बचत होऊन ती भविष्यासाठी उपयोगी पडते, असे प्रतिपादन आमदार विक्रम पाचपुते यांनी केले. 

धुनकवाड येथे सरपंच भागवत गव्हाणे यांच्या पुढाकारातून पिण्याच्या पाण्याची सोयबंद हातपंपांना मोटार बसवून टाक्यांची व्यवस्था;ग्रामस्थांना दिलासा
चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण

COMMENTS