Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हेच माझे ध्येय-अमरसिंह पंडित;प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ

गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघ जलसिंचनाच्या माध्यमातून पाणीदार करणे हेच आपले ध्येय असून शेतकर्‍यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्र

पिंपळनेर येथील जि.प. शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ;आ. विजयसिंह पंडितांनी वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 77 लाखांचा निधी मंजूर करुन आणला
शिक्षक-विद्यार्थी हितासाठी गतिमान प्रशासनाचा संकल्प : उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदेमा.आ.अमरसिंह पंडित यांनी केला उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांचा सत्कार
शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डात 100 टक्के निकाल!

गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघ जलसिंचनाच्या माध्यमातून पाणीदार करणे हेच आपले ध्येय असून शेतकर्‍यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्प जलशारदाच्या माध्यमातून निकाली निघणार आहे. मतदारसंघांमध्ये यापूर्वी सिंदफणा नदीवर बंधारे उभारून आपण जलसिंचन क्षमता वाढवली असून या पुढील काळातही पाण्यासाठी कायम काम करत राहू अशी ग्वाही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगालीपिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते प्रकल्प जलशारदा अंतर्गत गेवराई तालुक्यातील मौजे बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नाम फाऊंडेशनचे मराठवाडा विभागीय समन्वयक राजाभाऊ शेळके, दत्तात्रय गर्जे, योगेश रसाळ, बंगालीपिंपळ्याचे सरपंच बाळासाहेब गायकवाड, उपसरपंच तुकाराम तळतकर, माजी पंचायत समिती सदस्य हिम्मत खरात, संजय तळतकर, दिलसुख चौधरी, माजी उपसरपंच महादेव कारंडे, सुधीर माने, अंबादास चौधरी, पांडुरंग तळतकर, संतराम गावडे, भाऊसाहेब कारंडे, सुनील चौधरी , प्रल्हाद धुमाळ, बाळाभाऊ सोलंकर शहादेव सजगणे, विष्णुपंत चौधरी, बाळासाहेब तळतकर, सखाराम चौधरी व महांडुळा येथील लहूराव ढोबळे, शेख अहमद, ढोबळे मच्छिंद्र, मुंजामिल शेख, शेख आलम, अण्णासाहेब घारगे, काकासाहेब घारगे, कांता माने, विठ्ठल माने, शेख हमीद, शेख हुसेन आदी पदाधिकारी, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, नाम फाऊंडेशन, शारदा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून ही कामे होणार आहेत. गेवराई तालुक्यात मौजे गोविंदवाडी, भेंडटाकळी, धानोरा यांसह आदी ठिकाणी लवकरच कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेवराई सारख्या सततच्या दुष्काळ आणि आवर्षण प्रवण भागात सिंचनाच्या सुविधा वाढाव्यात, पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी या दृष्टीकोनातून मागील अनेक वर्षांपासून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशन, शारदा प्रतिष्ठान, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभागातून नदी, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण या कामांसह जुन्या बंधार्‍यांचे पुर्नजीवन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला चांगले यश मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

COMMENTS