कर्जत : येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने थोर संत बसवेश्वर यांची जयंती भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने बसवेश्वर

कर्जत : येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने थोर संत बसवेश्वर यांची जयंती भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. रमेश जेवरे, अनिल जेवरे, भीमराव पखाले, स्वामी मयूर पखाले, जी न्यूज चैनलचे संपादक गणेश जेवरे, दत्तात्रय विभूते, मोहनराव होळकर, महेश जेवरे, योगेश जाधव,सचिन जेवरे, संग्राम चिंचकर, मंगेश जेवरे, प्रसाद जेवरे, विश्वजीत जेवरे, शुभम जेवरे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित वक्त्यांनी संत बसवेश्वर यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेतला. समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांमुळे समाजात परिवर्तन घडून आले असून आजच्या पिढीने ते आचरणात आणण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमामुळे कर्जत परिसरात भक्तीमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून संत बसवेश्वर यांच्या विचारांना उजाळा दिला.

COMMENTS