Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जमाफी लढा हीच पुढील आंदोलनाची दिशा-डॉ.अजित नवले

बीड : जिल्ह्यातील सिरसाळा या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे दर तीन वर्षांनी होणारे 24 वे बीड जिल्हा अधिवेशन पार पडले. यावेळी बोलत असताना किसान सभ

कर्जमाफीच्या अटी शर्तिच्या विरोधात किसान सभेचे बीड जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे काढणार!
शेतकरी संघटनेचे निवासी  कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : किसान सभा

बीड : जिल्ह्यातील सिरसाळा या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे दर तीन वर्षांनी होणारे 24 वे बीड जिल्हा अधिवेशन पार पडले. यावेळी बोलत असताना किसान सभेचे राज्य सचिव कॉ.अजित नवले यांनी अधिवेशनाच्या समारोपात मनोगत व्यक्त करताना शेतकर्‍यांच्या समोरील विविध आव्हानाची लढाई सर्व शेतकर्‍यांच्या एकजुटीतून लढावी लागणार आहे असे सांगितले. सर्वच शेतकरी संघटनांनी व्यापक एकजूट करून शेतकरी कर्जमाफी आणि तिचा मुहूर्त ठरवण्याचा लढा दिला पण लढून मिळवलेली ही कर्जमाफी सुद्धा शासनाने निकषात अडकून जास्तीत जास्त शेतकरी यापासून वंचित कशी राहतील अशा अटी आपल्याच मंत्र्याकडून माध्यमांमध्ये पेरून याद्वारे लोकांच्या मनाची पूर्वतयारी सुरू केली आहे जरी कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्याबाबतच्या अटी शर्ती मागे ठेवून शेतकर्‍यांचा जीव टांगणीला टांगला आहे ज्यावेळी या अटी शर्ती बाहेर येतील त्यावेळी शेतकर्‍यांचा भडकलेला असंतोष आणि नैराश्य याला मार्ग काढण्यासाठी उतरावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकर्‍यांसमोर एवढीच अडचण नसून देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर वाढणारी प्रचंड महागाई शेतकर्‍यांचे जीवन देशोधडीला लावणारी असेल यातच भर म्हणून की काय जगभरातल्या हवामान प्रयोगशाळेच्या अहवालानुसार आपल्या मान्सून वार्‍यावर प्रभाव पडणार्‍या प्रशांत महासागरातील अति तीव्र स्वरूपाचा एल निनो सक्रिय होऊन तीव्र दुष्काळी स्थिती सामोरे जाण्यासाठी ची तयारी आपल्याला करावी लागणार आहे म्हणून पीक विम्याचे कवच आपल्याला शेतकरी हिताचे कसे करता येईल याची लढाई सुद्धा लढावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही लढाई लढाईची असेल तर व्यापक एकजूट आवश्यक असते आणि देशात राज्यात बदललेल्या स्थितीमुळे सामाजिक एकोपा संकटात आलेला आहे यामुळे माणूस माणसात राहिला नसून धार्मिक व जातीय मुद्द्यावर ज्या प्रमाणात लोक एक एकत्र येतात त्याच प्रमाणात वर्गीय आर्थिक प्रश्नावर लोक एक संघ होऊ शकत नाहीत या स्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला शिव फुले शाहू आंबेडकर यांचाच विचार आणि कृती तारू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्घाटन सत्रात केंद्र व राज्य सरकारची शेतकर्‍या विषयीची उदासीन धोरणे व त्यातून शेतकर्‍यांसमोर समस्यांचा उभा राहिलेला डोंगर यावर आपण आपण या अगोदरही पिक विमा उसा आंदोलनाच्या लढ्यातू मार्ग काढला आहे पुढेही असेच लढत राहण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन केले.  संघटनेचे सचिव मुरलीधर नागरगोजे यांनी मागील साडेतीन वर्षाच्या संघटनेच्या कामाचा लेखाजोखा अहवालाद्वारे सर्वांसमोर ठेवला हमीभाव पिक विमा कर्जमाफी याबाबतचा ठराव राजेंद्र तौर यांनी मांडला तर भगवान बडे यांनी वन्य प्राण्यांचा त्रास क्षेत्र असते व सोलर अडचणी याबाबतचा ठराव मांडला तर खाजगीकरणाच्या युगात आपल्या आर्थिक अधोगतीचे उत्तर आपण आरक्षणात शोधतो आणि एकमेकांच्या समोर जाती-जातीच्या झेंड्याखाली उभे राहतात या वर्गीय लढ्यावर लोकांची एकजूट करण्यासाठी जातीपातीचा प्रश्न सोडून शेती मातीवर लोक एकत्र येण्यासाठी सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याबाबतचा ठराव ब्रम्हानंद देशमुख मांडला. या सर्व ठरावावर व्यापक चर्चा होऊन सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले आणि पुढील तीन वर्षाचे कामकाज पाहण्यासाठी 15 सदस्यांची जिल्हा कमिटी निवडण्यात आली यामध्ये पूर्वीप्रमाणेच किसान सभेचे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून कॉम्रेड अजय बुरांडे व सचिव म्हणून मुरलीधर नागरगोजे यांची निवड करण्यात आली अध्यक्ष मंडळात भगवान बडे कृष्णा सोळंके दादासाहेब शिरसाट बालू कडबाने यांनी कामकाज पाहिले तर मिनिट्स कमिटी मध्ये रुस्तुम माने यांनी काम पाहिले या अधिवेशनास बीड जिल्ह्याचे अध्यक्ष बुरांडे व राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांनी संबोधित केले.

COMMENTS