Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कवी, लेखक, लोककलावंत हे समाजभक्ती व नीतीशक्ती वाढविणारे घटक; डॉ. बाबुराव उपाध्ये : श्रीरामपुरात लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे कविसंमेलन उत्साहात

श्रीरामपूर : कवी, लेखक, लोककलावंत यांच्या लेखनात आणि प्रबोधन सादरीकरणात नेहमीच समाजभक्ती व नीतीशक्तीचा आविष्कार असतो, ते संस्कृतीचे सर्वोत्तम घटक

‘प्रवरा’तील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेचे आयोजन
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  

श्रीरामपूर : कवी, लेखक, लोककलावंत यांच्या लेखनात आणि प्रबोधन सादरीकरणात नेहमीच समाजभक्ती व नीतीशक्तीचा आविष्कार असतो, ते संस्कृतीचे सर्वोत्तम घटक असल्याचे मत श्रीरामपूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहात लोककला कलावंत साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य व लक्ष्मीमाता मंदिर ट्रस्ट वडाळा महादेव यांच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलन आणि गुणवंत साहित्यिक, शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अरुण पा. नाईक, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, स्वागताध्यक्ष पोलीस अधिकारी संजय भोंडवे, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्कर, निमंत्रित कविसंमेल अध्यक्ष डॉ. संजय दुशिंग, कवी मोहिनीराज होन यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार, अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काव्यसरिता दिवाळी अंकाचे संपादक,संयोजक साहित्यिक बाबासाहेब पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा सत्कार केला.
उद्घघाटक अरुण पा. नाईक यांनी कवी बाबासाहेब पवार यांच्या साहित्यिक कार्याचे मोठेपण सांगून जे न देखे रवी ते देखे कवी, यासंदर्भाने कवीचे महत्त्व विशद केले. या साहित्यिक चळवळीला आपण नेहमीच सहकार्य करीत राहू असे आश्‍वासन दिले डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्व कवी – कवयित्री यांच्या कविता सादरीकरणाचे कौतुक करून शब्दसेतू कविता सादर केली. म माजी प्राचार्य टी.ई. शेळके,पोलीस अधिकारी संजय भोंडवे, कवी मोहिनीराज होन, सायमन भारस्कर, कवी पोपटराव पटारे आदिंनी मनोगत व्यक्त केले.


जो साहित्यिक इतरांना मोठे करतो, तोच आदरास पात्र होतो : प्रकाश कुलथे
प्रमुख पाहुणे पत्रकार प्रकाश कुलथे म्हणाले, श्रीरामपूर ही आधुनिक नगरी आहे, येथे सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात. 01 सप्टेंबर 1947 रोजी नगर परिषदेची स्थापना होऊन हे शहर वैभवशाली होत आहे. या शहरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये हे 1977 पासून जिल्ह्यात साहित्य चळवळ चालवतात, विविध साहित्यिक उपक्रम घेतात, साहित्यिक, संयोजक बाबासाहेब पवार यांचेही अनेक वर्षापासून योगदान आहे, स्वतः झळ सोसून असे साहित्यिक उपक्रम घेतात, साहित्यज्योत प्रज्वलित ठेवतात, हे विशेष कौतुकास्पद आहे,जे साहित्यिक इतरांना मोठे करतात, तेच आदरास पात्र ठरतात, असे गौरवोदगार काढून पत्रकार कुलथे यांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS