Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन

नांदेड : मुलींमध्ये होणारा गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष, लायन्स क्लब

भूमी अभिलेख कार्यालयावरून श्रेयाची लढाई; शांतपणे डाव साधला खा.चव्हाण यांनी
बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?
जे बोलतो ते करतो; आरोग्य व शिक्षणासाठी माझी बांधिलकी कायम-खा.डॉ. गोपछडे

नांदेड : मुलींमध्ये होणारा गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष, लायन्स क्लब, अमरनाथ यात्रेकरू संघ तसेच मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही (कझत) लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत शिवशक्तीनगर, नांदेड येथे पार पडणार असल्याची माहिती धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
या शिबिराचे आयोजन खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ड. महेश कनकदंडे तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम ही गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन (8 मार्च 2026) पासून सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश मुलींना एचपीव्ही विषाणूपासून संरक्षण देऊन भविष्यातील महिलांचे आरोग्य सुरक्षित करणे हा आहे. या मोहिमेत 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना प्राधान्य देण्यात आले असून त्यांना गार्डासिल-4 ही लस मोफत दिली जात आहे. ही लस एचपीव्हीचे 16 व 18 प्रकारांपासून संरक्षण देते, जे गर्भाशयाच्या कर्करोगासाठी सुमारे 70 टक्के जबाबदार मानले जातात. एकच डोस देण्यात येणारी ही लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सुमारे 9.84 लाख मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ही मोहीम मिशन मोडमध्ये तीन महिन्यांत राबविण्यात येत आहे. यू-विन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करून लसीकरणानंतर डिजिटल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. पुढील काळात ही लस नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याचा मानस आहे. एचपीव्ही हा मुख्यतः लैंगिक संपर्कातून पसरणारा विषाणू असून गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. त्यामुळे लहान वयात, विषाणूच्या संपर्कापूर्वी लस दिल्यास तिचा प्रभाव अधिक चांगला राहतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. एचपीव्ही लस म्हणजे कर्करोगापासून संरक्षण आणि एक डोस – आयुष्यभराची सुरक्षा हा संदेश लक्षात ठेवून पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढे आणावे, असे आवाहन ड. दिलीप ठाकूर यांनी केले. शिबिराला येताना मुलींनी आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

COMMENTS