Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करा : राष्ट्रपती मुर्मू‘एम्स’चा द्वितीय दीक्षान्त समारंभ ; राज्यपाल, मुख्यमंत्री यांची उपस्थिती

नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज

वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
अखेर 9 वर्षांचा प्रतीक्षेचा शेवट: चर्‍हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; डॉ. गणेश ढवळे यांच्या आंदोलनाला यश
अमरावती जिल्ह्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू

नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रात यशासह करुणेचा भाव जपल्यास तुम्ही एक उत्तम व्यक्तीही होऊ शकाल, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी येथे केले.
केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) द्वितीय दीक्षान्त समारंभ संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपले हे विचार मांडले. या समारंभात राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॅा. प्रशांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित वैद्यकीय विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्र हा केवळ एक व्यवसाय नसून संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा एक मार्गही आहे. एक वैद्यकीय चिकित्सक केवळ आजारांवर उपचार करत नाही, तर तो आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनात आशेचा संचारही निर्माण करतो. चिकित्सकाचा सहानुभूतीचा सल्ला केवळ आजारी व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनाही आधार देतो. अनेकदा डॉक्टरांसमोर कठीण परिस्थिती निर्माण होते. मात्र, अशा परिस्थितीतही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदनशील राहणे आवश्यक आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील आरोग्य कर्मचार्‍यांशी नेहमी सन्मानाने वागायला हवे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्लाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी दिला.

एम्स आणि आरोग्य विद्यापीठात व्यापक सहकार्य हवे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा
मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आणि कर्करोगासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये सध्या मोठी वाढ होत आहे. नैराश्य, चिंता आणि व्यसनाधीनतेसारख्या मानसिक आजारांच्या समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली असून आयुष्यमान भारत सारख्या योजनांमुळे लोक दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी शासकीय रुग्णालयांकडे वळत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी बोलताना केले.

पाच किमीच्या परिघात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात 15 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी व्यापक नियोजनाची आवश्यकता आहे. पाच किलोमीटरच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS