https://www.youtube.com/watch?v=DZiZk4w4bu8 चंद्रपूर : चंद्रपूर शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात ड
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात एक खळबळ जनक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जयंतीच्या डीजेमध्ये नाचण्याच्या वादातून पाच युवकांनी एकाला भोसकुन हत्या त्याची करण्यात आली आहे. रविकांत टेंभूरकर (वय 36) असं या मयत तरुणाचं नाव आहे. त्याला रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच रविकांत टेंभूरकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह पाच युवकांना हत्येप्रकरणी अटक केली आहे. जयंतीच्या डीजेमध्ये नाचताना लागलेला धक्का हे भांडणाचे कारण ठरले असून हा रक्तरंजित प्रकार घडलाय. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
किरकोळ वादावरून झालेल्या या हत्येच्या घटनेने चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या दिवशीच या घटनेनं शहर हादरले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई सुरु आहे

COMMENTS