Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शिव’ ओलांडताच अंधाराचा विळखा; तरोडा (बु.) परिसरातील नागरी सुविधांचा बोजवारा

नांदेड :नांदेड शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना महापालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या तरोडा( बु.) परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी सं

सेनापती बापट पतसंस्थेच्या संचालकांविरोधात उद्रेक; माजी आमदार विजय औटींच्या घरासमोर ठेवीदारांची घोषणाबाजी
“NEET पेपर लीक आणि महागाईवरून विजय वडेट्टीवारांचा मोदी सरकारवर घणाघात; ‘हे सरकार हिटलरशाही पद्धतीचे!”
निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा

नांदेड :
नांदेड शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना महापालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या तरोडा( बु.) परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाजीनगरकडून तरोडा (बु.)कडे जाताना एका बाजूला झगमगाट आणि ‘शिव’ ओलांडताच पसरलेला अंधार, अशी परिस्थिती येथे दररोज अनुभवायला मिळत आहे. यामुळे एकाच शहरात दोन वेगळे चेहरे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तरोडा( बु.)भागात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकदा तासन्तास वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिसर पूर्णतः अंधारात बुडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होते. अंधाराचा फायदा घेत चोरी, अपघात यांसारख्या घटनांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे. महापालिकेत समावेश होऊनही अपेक्षित नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत, ही येथील प्रमुख समस्या ठरत आहे. रस्ते, स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठा अशा मूलभूत सेवांमध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. लाईटची बोंबाबोंब ही आजची नाही, तर रोजचीच समस्या झाली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले असले तरी निवडणुकीनंतर ते नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रचाराच्या काळात आश्वासनांची सरबत्ती करणारे लोकप्रतिनिधी आता मात्र शांत असल्याचे चित्र आहे. महापालिकेत या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याऐवजी मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर काही जागरूक नागरिकांनी मतदान प्रक्रियेतील चुकीच्या प्रवृत्तीवरही बोट ठेवले आहे. पैसे घेऊन मतदान करण्याची सवयच या समस्यांना कारणीभूत ठरत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तरोडा (बु. )परिसरातील नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून वीजपुरवठा आणि इतर नागरी सुविधांबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS