Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिक : महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असणार्‍या अशोक खरातला सोमवारी कोर्टान 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. क

वकिलाच्या कारमधून 1.90 कोटीचे ‘मेफेड्रोन’ जप्त
पुण्यात वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी! हडपसरमध्ये क्रेडिट कार्ड रिकव्हरी एजंट्सनी भररस्त्यात मारहाण
पुण्यात दारूच्या नशेत मित्राचा केला खून


नाशिक : महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असणार्‍या अशोक खरातला सोमवारी कोर्टान 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसर्‍या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी त्याच्यावर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत. विशेष तपास पथक या सर्वच प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

COMMENTS