Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुदखेड मतदारसंघातील अनियमिततेवर अंदाज समितीची झडती; पोषण आहार व वाळू उपशावर गंभीर प्रश्नचिन्ह

नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीने दुसर्‍या दिवशी अचानक मुदखेड विधानसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळवत विविध

आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावाप्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा; दर्जेदार कामांना प्राधान्य-आ.सुरेश धस
खंडित वीजपुरवठ्यामुळे तरोडावासीय हैराण; नागरिकांचा संताप वाढला
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्‍यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी



नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीने दुसर्‍या दिवशी अचानक मुदखेड विधानसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळवत विविध विकासकामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
समितीने चिकाळा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहाराची तपासणी केली. शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना हिरवा चना देण्याचे नोंदीत दाखवले असताना प्रत्यक्षात मात्र पांढरा वाटाणा दिला जात असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे प्रति किलो तब्बल 270 रुपयांचा फरक असल्याचे समितीने स्पष्ट केले. या अनियमिततेमुळे पोषण आहार योजनेत आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. याच शाळेत पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी समोर आल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या योजनेत निष्काळजीपणा होत असल्याबद्दल समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शाळेतील स्वच्छतागृह बंद अवस्थेत आढळून आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे चित्र समोर आले. याबाबत संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, मुदखेड तालुक्यातील येळेगाव येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची बाबही समितीच्या पाहणीत उघड झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. या प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून, कठोर कारवाईचे संकेत समितीने दिले आहेत. अंदाज समितीच्या या अचानक दौर्‍यामुळे मुदखेड मतदारसंघातील विविध कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील प्रशासनिक यंत्रणा आता चौकशीच्या रडारवर आली आहे. पुढील काळात या पाहणीचा अहवाल सादर होणार असून, दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS