Homeताज्या बातम्या

शिवसेनेचा पारनेर तहसीलवर मोर्चाशेतकरी आक्रमक ; अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी

पारनेर : अलीकडेच झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच कांद्याचे ब

तहसिलदार गायकवाड यांना वृक्षरोप देऊन पत्रकारांनी वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा…!
सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक
नागपुरात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

पारनेर : अलीकडेच झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने उभ्या पिकांचा खर्च निघणेही कठीण झाले असून, या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केले. अध्यक्षस्थानी शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे होते. मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना तातडीने मिळावी, घसरलेल्या बाजारभावाचा विचार करून कांद्याला प्रति किलो १० रुपये अनुदान जाहीर करावे आणि तालुयातील गॅस एजन्सींकडून ग्राहकांची होणारी आर्थिक लूट प्रशासनाने तत्काळ थांबवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पारनेर तालुयात पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये प्रामुख्याने आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, याच बैठकीत तालुयातील शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नांनी लक्ष वेधून घेतले. यानंतर पारनेर तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्कर शिरोळे, पोपट चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, मा. तालुकाप्रमुख गुलाब नवले, शहर प्रमुख निलेश खोडदे, जिल्हा समन्वयक सखाराम उजघरे, संतोष येवले, अर्जुन आढाव, नितीन आहेर, संदीप मोढवे, कैलास ढोमे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..तर शिवसेना स्टाईलने आंदोलन

या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. जर येत्या दहा दिवसांत सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही, तर ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे तालुयात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.

COMMENTS