Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

देशद्रोह प्रकरणात रामपालला जामीन

चंदीगड : हिसार येथील सतलोक आश्रमाचे प्रमुख रामपाल यांना देशद्रोहाशी संबंधित प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने त्यां

संभाजीनगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणीची भरदिवसा हत्या
चोरीची अल्युमिनियम तार घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडला; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
केजमध्ये ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यातवारसाचा फेर घेण्यासाठी मागितली 39 हजारांची लाच

चंदीगड : हिसार येथील सतलोक आश्रमाचे प्रमुख रामपाल यांना देशद्रोहाशी संबंधित प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ते सुमारे अकरा वर्षांहून अधिक काळ कारागृहात होते. सध्या ते हिसार मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
रामपाल यांना 19 नोव्हेंबर 2014 रोजी हिसार जिल्ह्यातील बरवाला येथील सतलोक आश्रमातून अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार हजर न राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी अटक करण्यासाठी आश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत पाच महिलांसह एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रामपाल यांच्याविरुद्ध देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. रोहतक परिसरातील करौंथा आश्रमाशी संबंधित एक जुने प्रकरणही चर्चेत आले आहे. 12 जुलै 2006 रोजी या आश्रमात रामपाल समर्थक आणि आर्य समाजाच्या सदस्यांमध्ये झालेल्या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुनावणी पुढे न्यायालयात सुरू होती. 2014 मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हिसार न्यायालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. रामपाल समर्थकांनी गोंधळ घालत तोडफोड केल्याचा आरोप आहे. काही वकिलांवरही हल्ला झाल्याचे त्या वेळी समोर आले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे रामपाल यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी इतर गुन्ह्यांतील न्यायप्रक्रिया अद्याप सुरूच राहणार आहे.

COMMENTS