मुंबई : राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्

मुंबई : राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठोस आणि परखड भूमिका मांडली आहे. महिलांनी अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करतांनाच त्यांनी खरात प्रकरणातील व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते असा सवाल केला आहे.
नाशिक परिसरातील अशोक खरात या भोंदूबाबाविरोधात उघड झालेल्या प्रकरणामुळे समाजात खळबळ उडाली आहे. अनेक महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत पुढे येण्याचे धाडस दाखवले आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेत भीती आणि अंधविश्वास निर्माण करून महिलांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार उघड होत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध चित्रफिती समोर आल्याने या प्रकरणाची तीव्रता अधिक अधोरेखित झाली आहे. याच संदर्भात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी समाजाला विचार करायला लावणारा सवाल उपस्थित केला. कथित चित्रफितींमध्ये महिलांना बेशुद्ध अवस्थेत दाखवले जात असल्याचा दावा केला जातो; मात्र प्रत्यक्षात अशा अवस्थेचे स्पष्ट चित्र कुठे दिसते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत या प्रकारांमागील वास्तव तपासण्याची गरज व्यक्त केली. समाज नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, काही भोंदूबाबा स्वतःला देवतांचे रूप असल्याचा दावा करतात आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. अशा लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कोणीही अशा प्रकारे स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी फोटो किंवा अन्य साधनांचा वापर करून लोकांची दिशाभूल करत असेल, तर त्याला कठोर विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणात पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे येत तक्रारी दाखल केल्याने कारवाईचा वेग वाढला आहे. समाजाने जागरूक राहून अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचा संदेश या घडामोडीतून अधोरेखित होत आहे.

COMMENTS