Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या वादातून वळणमध्ये हत्या; राहुरी पोलिसांकडून संशयिताला तात्काळ अटक

देवळाली प्रवरा : वळण (ता. राहुरी) येथे जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची गंभीर घटना शनिवारी दुपारच्या  दरम्यान घडली. या घटनेम

रूपाली चाकणकरांनी नैतिकेच्या आधारावर पद सोडावे : खा. संजय राऊत
बलात्कारी अशोक खरातच्या प्रकरणी एसआयटीची स्थापना; आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते करणार तपास
महिला दिनीचे भाषण चाकणकरांना भोवले !

देवळाली प्रवरा : वळण (ता. राहुरी) येथे जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची गंभीर घटना शनिवारी दुपारच्या  दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कृष्णा शंकर कुलट असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणातील संशयित आरोपीला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत दादा कुलट याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. जुन्या वादातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.जखमी कृष्णा कुलट यास नगर येथे उपचारासाठी दाखल केले परंतू उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराची पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान, मृत  कृष्णा शंकर कुलट यांच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमल्याने काही काळ वादावादीची परिस्थिती निर्माण झाली होती. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच पोलिस उपअधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS