Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात बालविवाहाचा गुन्हा दाखल

पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

वाशिममध्ये किरकोळ वादातून दिवसाढवळ्या बाजारात थरार; १०-१२ जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने पाच जणांवर जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल!
पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा
मनपा पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक करा, धिंड काढा-कर्मचार्‍यांचा संताप उसळला; खडकपुरा-वाघी रोडवरील घटनेचा तीव्र निषेध; मनपा प्रवेशद्वारासमोर निषेध सभा

पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बालविकास प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका स्वाती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइन 1098 कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा उलगडा झाला.

COMMENTS