Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भगवान महावीरांचा ‘जगा आणि जगू द्या’ संदेश आचरणात आणावा : नगराध्यक्ष गाडेकर

राहाता : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. तसेच

‘गरीब विद्यार्थी फंडा’त १९ लाखांची जमा; दादा पाटील महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम
गुरुकुलमध्ये आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन 
खरात संबंधीत सर्व खाती गोठवली; समतातील सर्व व्यवहार पारदर्शी : संदीप कोयटे

राहाता : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. तसेच अहिंसा, सत्य आणि करुणा या तत्वांचा अंगीकार करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी केले.

भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. गाडेकर यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक प्रवीण सदाफळ, दशरथ तुपे, ऍड. मयूर पाळंदे, शशिकांत लोळगे, नितीन गाडेकर, प्रभाकर आरणे, सुयोग शेळके, अरुण गाडेकर यांच्यासह रमणलाल रुणवाल, गोटूशेठ राईसोनी, प्रफुल पिपाडा, राजेश भन्साळी, पारस धाडीवाल, प्रवीण डुंगरवाल, नंदलाल डुंगरवाल, महावीर पिपाडा, मनोज पिपाडा, गोपी पिपाडा, चेतन रुणवाल, अभय रुणवाल, कमलेश रुणवाल, अजीत धाडीवाल, सचिन अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना डॉ. गाडेकर म्हणाले, भगवान महावीर हे जगभरातील मानवासाठी शांती, अहिंसा आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. त्यांनी दिलेला संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. समाजात एकोपा आणि सलोखा टिकवण्यासाठी या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

 राज्यातील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदारसंघात सामाजिक एकात्मता जपण्याचे कार्य केले असून, त्याचे उदाहरण नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत दिसून आले. जैन समाजातील प्रवीण रुणवाल यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करून सर्वांना समान संधी दिली जात असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

 दरम्यान, जैन समाजाकडून नवीन जैन स्थानक उभारणीसंदर्भात प्रस्ताव आल्यास तो राज्य सरकारकडून मंजूर करून घेऊन नगरपरिषदेच्या माध्यमातून भव्य जैन स्थानक उभारण्यात येईल, अशी ग्वाहीही डॉ. गाडेकर यांनी दिली. 

COMMENTS