Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसील कार्यालयातील जप्त वाळूसह ऑटो चोरणारा अटकेत; किनवट पोलिसांची धडक कारवाई

किनवट : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातून जप्त केलेला मुद्देमाल चोरून नेणार्‍या आरोपीला किनवट पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत

दुसर्‍याच्या मतदारसंघात हस्तक्षेप योग्य आहे का ?
Nanded : नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले !
विठ्ठलनामाच्या जयघोषात आ. बालाजी कल्याणकर यांचा सुरमयी वाढदिवस साजराशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या स्वरधारांनी नांदेडकर चिंब झाले, निसर्गालाही मोहित केले!

किनवट : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातून जप्त केलेला मुद्देमाल चोरून नेणार्‍या आरोपीला किनवट पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. सोनु संजय माने (रा. गंगानगर, किनवट) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
तहसील कार्यालय किनवटच्या वॉल कंपाऊंडमधील खुल्या जागेत प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी एक लोडिंग ऑटो किंमत 30 हजार रुपये आणि त्यामध्ये भरलेली अर्धा ब्रास रेती (किंमत 1,500 रुपये असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ठेवला होता. 21 मार्च 2026 रोजी हा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी नायब तहसीलदार चंद्रशेखर सहारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात गु. र. नं. 58/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासकीय जप्त मुद्देमाल चोरीला गेल्याने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप श्रीमनवार यांनी तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गंगानगर येथील सोनु संजय माने याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला लोडिंग ऑटो आणि वाळू हस्तगत केली आहे. तहसील कार्यालयासारख्या सुरक्षित मानल्या जाणार्‍या ठिकाणाहून मुद्देमाल चोरीला गेल्याने परिसरात खळबळ माजली होती, मात्र पोलिसांनी तत्परतेने आरोपीला जेरबंद केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप श्रीमनवार करीत आहेत.

COMMENTS