Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंडलवाडी-बावलवगाव पाणंद रस्त्याला मंजुरी;  90 दिवसांत दिलेला शब्द पूर्ण

कुंडलवाडी : कुंडलवाडी ते बावलगाव दरम्यानचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अखेर मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्रतिनिध

कुंडलवाडी शहरात भेसळयुक्त विक्रीचा प्रकार; नागरिकांमध्ये संताप
वन विभागाकडून वानराच्या पिल्लाची सुटका
कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

कुंडलवाडी : कुंडलवाडी ते बावलगाव दरम्यानचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अखेर मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार यांच्या हस्ते पार पडले.
या भागातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द अवघ्या 90 दिवसांत पूर्ण करून नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावार यांनी आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी नगराध्यक्षा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माजी मुख्यमंत्री तथा  खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे आणि आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे केलेल्या प्रयत्नांमुळे या कामाला मंजुरी मिळाली. स्थानिक शेतकर्‍यांनीही हा प्रश्न वारंवार प्रशासनापुढे मांडला होता. त्यांच्या पाठपुराव्याला लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची जोड मिळाल्याने अखेर अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. भूमिपूजन प्रसंगी नारळ फोडून रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असून नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार, शैलेश र्‍याकावर, नगरसेवक रमेश ईरलावार, प्रदीप खेळगे, शेख मुक्तार, संजय गोनेलवार, गंगाधर कोटलावार,संजय खुळगे, नरसिंह चव्हाण, गंगाधर खेळगे, हनमंत मुनगीलवार, गंगाधर जेठेवाड, अनिल पेंटावार, जयप्रकाश कमटलवार, भूषण कोलंबरे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS