Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनसीसी छात्रसैनिकांची अहिल्यानगर टॅंक म्युझियमला भेट

कोपरगाव : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील एनसीसी छात्रसैनिकांनी १५ मार

अ‍ॅड. संदीप वर्पे यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलवर वर्णी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत आत्मा मलिकचे यश  
 शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घ्यावी : आ.काळे

कोपरगाव : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील एनसीसी छात्रसैनिकांनी १५ मार्च २०२६ रोजी अहिल्यानगर येथील आशिया खंडातील पहिल्या केव्हलरी टॅंक म्युझियमला अभ्यासपूर्ण भेट दिली.

आर्मड कॉर्पस सेंटर अँड स्कूलच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या टॅंक म्युझियममध्ये छात्रसैनिकांना विविध रणगाड्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विविध युद्धांमध्ये या रणगाड्यांनी बजावलेली भूमिका आणि स्वदेशी रणगाड्यांची वैशिष्ट्ये याविषयी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या भेटीद्वारे रणगाड्यांचे सैन्यदलातील महत्त्व व उपयोग छात्रसैनिकांना प्रत्यक्ष पाहता व समजून घेता आला. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडल्याचे शिक्षकांनी सांगितले.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीपराव रोहमारे तसेच प्राचार्य प्रा. विजय ठाणगे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी अधिकारी कॅप्टन नितीन शिंदे व लेफ्टनंट वर्षा आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS