Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उसतोड कामगाराच्या मुलाची पोलीस खात्यात भरारी; राहुल कळसणेचा गुजर समाजाकडून सत्कार

बीड : राहुल सुनिता बाबुराव कळसणे याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गुजर समाजाच्या वतीने त्याचा व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करून शुभेच

धार्मिक स्थळांसाठी ध्वनिक्षेपक परवाना अनिवार्य; केजमधील मंदिरांनी घेतला पुढाकार
अतिवृष्टीने केले नुकसान; त्यात तलाठी भाऊसाहेबाची भर ! मदतीपासून खरे शेतकरी वंचित…
उमरीत शिवजन्मोत्सव निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन

बीड : राहुल सुनिता बाबुराव कळसणे याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गुजर समाजाच्या वतीने त्याचा व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
राहुलचे आई-वडील साध्या कुटुंबातील असून ऊसतोडणी करून मुलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे आदर्श पालक आहेत. आई-वडील ऊसतोडणीसाठी बाहेर गेल्यानंतर राहुलने स्वतः स्वयंपाक करणे, शेतीतील कामे सांभाळणे आणि उर्वरित वेळेत जिद्द व चिकाटीने अभ्यास करणे अशी कसरत केली. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हा निर्धार मनाशी बाळगून त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्याचे फळ म्हणून आज त्याची पोलीस खात्यात निवड झाली आहे. राहुलने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे नाव उंचावले आहे. यावेळी बोलताना गुजर समाजाचे नेते अर्जुन दादा बहिरवाळ म्हणाले की, राहुलला आज यश मिळाले असले तरी इतर युवकांनीही खचून न जाता मेहनतीने पुढे जावे. राहुलचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, हीच अपेक्षा आहे. तसेच गुजर समाजाचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी सांगितले की, राहुलच्या रूपाने समाजाची प्रगती दिसत आहे. तळागाळातील युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आई-वडिलांचे, समाजाचे आणि गावाचे नाव मोठे करावे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

COMMENTS