बीड : संत बंकटस्वामी महाराज यांच्या 73 व्या फिरत्या नारळी सप्ताहास बीड तालुक्यातील मांडवखेल येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. संत महंत लोकप्रतिन

बीड : संत बंकटस्वामी महाराज यांच्या 73 व्या फिरत्या नारळी सप्ताहास बीड तालुक्यातील मांडवखेल येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. संत महंत लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालखी पूजन,ग्रंथ, विना,टाळ मृदंग पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत हरिहर भारती महाराज, महंत तुकाराम भारती महाराज,श्री ह भ प श्रीहरी महाराज पवार, श्री ह भ प प्रा.नाना महाराज कदम , श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, दिनेशानंद शास्त्री महाराज, वसंत महाराज शिंदे, रंजीत महाराज शिंदे, अनिल महाराज कासकर, गणेश महाराज आस्वले, यांच्यासह बंकटस्वामी संस्थांचे विश्वस्त,मांडवखेल गावातील सप्ताह कमिटी, हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
वारकरी सांप्रदायाचे भक्तिसूर्य संत बंकटस्वामी महाराज यांचा संत सुदामदेव महाराजांनी सुरू केलेला 73 व्या फिरत्या नारळी सप्ताहास बीड तालुक्यातील मांडवखेल या ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी मनोगत व्यक्त आज मांडवखेल मध्ये पंढरपूर निर्माण झाले आहे, संत बंकट स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही, वारकर्यांची सेवा करणे हे परम भाग्य ने मिळते त्यामुळे आलेल्या वारकर्यांची सेवा करा असे श्री ह भ प महंत हरिहर भारती महाराज म्हणाले.. तर बंकट स्वामी हे वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य आहेत त्यांची तेजस्वी परंपरा आज महंत लक्ष्मण महाराज मेंगडे हे चालवत आहेत असं स्त्री हा श्रीहरी महाराज पवार म्हणाले, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा त्यामुळे या आध्यात्मिक पर्वणीचा आनंद लुटावा असं सुरेश महाराज जाधव म्हणाले, पांडवखेल गाव हे अत्यंत भाविक आणि श्रद्धेने भक्ती करणारे गाव आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन उत्सव आनंदाने पार पाडवा, असे म्हणत लक्ष्मण महाराज मेंगडे म्हणाले. आठ दिवस सप्ताहात श्रीमद् भागवत कथा, किर्तन, भजन याची रेलचे राहणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य श्री ह भ प जनार्दन महाराज श्रीक्षेत्र आळंदी कर यांची सात दिवस सुसरावी अशी भागवत कथा दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये संपन्न होणार आहे.. तर दररोज रात्री नऊ ते 11 या वेळेत हरिकीर्तन होणार आहेत. पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर अकोला, दुसर्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प चैतन्य महाराज निंबोळे नाशिक, तिसर्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प शांतिब्रह्म महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, चौथ्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प जगन्नाथ महाराज पाटील मुंबई, पाचव्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प बाळू महाराज गिरगावकर परभणी, सहाव्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, सातव्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प ज्ञानसिंधू संदिपान महाराज शिंदे हासेगावकर, तर नारळी सप्ताहाचे काल्याचे किर्तन दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजता महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होणार आहे तरी या सर्व अध्यात्मिक श्रवणाच्या पर्वणीचा भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी मांडवखेल, संत बंकट स्वामी महाराज संस्थान चे विश्वस्त व बंकट स्वामी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS