Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

३ महिन्यांनंतर कदाचित एलपीजी मिळणे बंद होईल : मंत्री छगन भुजबळ

https://youtu.be/jCUatULwD6g?si=SauW6IM2jYYKqnyi अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गॅस पुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

 बर्गेवाडीत गोदड महाराजांच्या पादुकांची शोभायात्रा
पीएनजी जोडणी घ्या, अन्यथा एलपीजी सिलेंडर होणार बंदमंत्री भुजबळ यांचा इशारा; पाइप गॅसवर भर देण्याचे आवाहन
डोकी ठिकाणावर ठेवून संवाद साधा !

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गॅस पुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG – पाईपद्वारे मिळणारा गॅस) यांचा पुरवठा अधिक सुलभ कसा करता येईल, यावर दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक झाली.
छगन भुजबळ यांनी सांगितले की, पुढील ३ महिन्यांनंतर जास्तीत जास्त पीएनजी (PNG) जोडण्या (Connections) करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की, सरकार आता सिलिंडरऐवजी पाईप गॅसवाढीसाठी प्रयत्नशील आहे.
ज्या शहरांमध्ये पीएनजी उपलब्ध आहे, तिथे नवीन इमारतींना ‘भोगवटा प्रमाणपत्र’ (OC) मिळण्यासाठी जसे पाण्याचे कनेक्शन अनिवार्य असते, तसेच आता पीएनजी कनेक्शन सुद्धा अनिवार्य (Mandatory) करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे.
गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी महानगरपालिका किंवा इतर विभागांच्या परवानगीसाठी वेळ लागू नये, म्हणून ‘डीम्ड परमिशन’ (मानिव परवानगी) तत्त्वावर ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पीएनजी हा एलपीजीच्या तुलनेत स्वस्त आणि पर्यावरणास पूरक आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सनी देखील याकडे तातडीने वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
थोडक्यात काय तर, एलपीजी पूर्णपणे बंद होणार आहे असे नाही, परंतु सरकारचा पूर्ण कल आता ग्राहकांनी पाईप गॅस (PNG) वापरण्याकडे आहे.

COMMENTS