Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गाच्या अतिक्रमण विरोधी विभागचे अंबाई हॉटेला बुलडोझर लावले; आठ दिवसांत आसना ते अर्धापूर तालुक्याची हद्द अतिक्रमण मुक्त करू- राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी

अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती अपघातांची मालिका व  वाहतुकीला अडथळा होवूनये यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाने अतिक

अफवांना पूर्णविराम : नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
किनवट बाजार समितीत 34 लाखांचा ’सोयाबीन घोटाळा’?शेतकर्‍यांचे पैसे लांबवल्याने संताप; गोडाऊन सील!
ज्येष्ठांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन-डॉ. हंसराज वैद्य

अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती अपघातांची मालिका व  वाहतुकीला अडथळा होवूनये यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम बुलडोजर लावून सुरू केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील हिंगोली जिल्हा हद्द ते असना नदीपर्यंत राष्ट्रीय मार्गावरील सर्व अतिक्रमणे,अवैध होर्डिंग्ज, पार्किंग व अनधिकृत दुकाने हटवण्यासाठी बुलडोझर लावून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली होती. आज अतिक्रमण काढले की उद्या जैसे थे परिस्थिती होत असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी फिरते पथक स्थापन करून अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेत आहे. हिवरा पाटीवरील अंबाई फॅमिली हॉटेलला बुलडोझर लावून अतिक्रमण काढले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी अतिक्रमण हटाव विशेष मोहीम हाती घेत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस बंदोबस्तात सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी सूचना न देता अंबाई फॅमिली हॉटेलला बुलडोजर लावून मोडतोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप हॉटेलचे मालक माधव गुरुपवार यांनी आमच्या प्रतिनिधीची बोलताना केला आहे.

COMMENTS