कोपरगाव : कोणत्याही व्यक्तीच्या यशामध्ये भाषा कधीच अडथळा ठरत नाही, तर स्वतःमधील क्षमता ओळखून योग्य वेळी त्या सिद्ध करण्याची गरज असते. प्रत्येकामध्ये अपार क्षमता दडलेली असते, मात्र ती संधी मिळाल्यावरच प्रकट होते. बदलत्या काळानुसार स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात नेमके काय साध्य करायचे आहे आणि कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे, हे स्पष्ट ठरवणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या कामात वेग आणि नियोजन किती आहे, यावरच यशाची खरे मोजमाप ठरते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी केले. संजीवनी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने इंडियन सोसायटी फॉर एज्युकेशनच्या सहकार्याने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थी उपक्रम परिषदेने आयोजीत केलेल्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा ‘संजीवनी टेकफेस्ट’ उद्घाटन प्रसंगी नितिन कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चिफ टेक्निकल ऑफीसर विजय नायडू, डॉ. प्रसाद पटारे, स्पर्धेचे जज रविंद्र जोशी उपस्थित होते. या स्पर्धेत ७५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांतर्गत सहभाग नोंदवला. यावेळी समन्वयक डॉ. कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना आपली कल्पना शक्ती आणि प्रतिभा दाखविण्याची संधी निर्माण केली आहे असे सांगितले. डॉ. पटारे यांनी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रगतीचा आलेख मांडला. नायडू म्हणाले की स्पर्धेमध्ये जिंकणे किंवा हरणे यापेक्षा सहभाग घेणे अधिक महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यातूनच व्यक्तिमत्वाचा आणि कौशल्यांचा खरा विकास घडतो. जोशी म्हणाले की येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून विद्यार्थ्यांनी त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम शिकवला जातो, त्याचेच हे यशस्वी फलित आहे. तसेच संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे जिथे कुठे असतील, तेथून संजीवनीची ही यशोगाथा अभिमानाने पाहत असतील, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

कोपरगाव : कोणत्याही व्यक्तीच्या यशामध्ये भाषा कधीच अडथळा ठरत नाही, तर स्वतःमधील क्षमता ओळखून योग्य वेळी त्या सिद्ध करण्याची गरज असते. प्रत्येकामध्ये अपार क्षमता दडलेली असते, मात्र ती संधी मिळाल्यावरच प्रकट होते. बदलत्या काळानुसार स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात नेमके काय साध्य करायचे आहे आणि कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे, हे स्पष्ट ठरवणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या कामात वेग आणि नियोजन किती आहे, यावरच यशाची खरे मोजमाप ठरते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी केले.
संजीवनी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने इंडियन सोसायटी फॉर एज्युकेशनच्या सहकार्याने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थी उपक्रम परिषदेने आयोजीत केलेल्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा ‘संजीवनी टेकफेस्ट’ उद्घाटन प्रसंगी नितिन कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चिफ टेक्निकल ऑफीसर विजय नायडू, डॉ. प्रसाद पटारे, स्पर्धेचे जज रविंद्र जोशी उपस्थित होते. या स्पर्धेत ७५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांतर्गत सहभाग नोंदवला.
यावेळी समन्वयक डॉ. कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना आपली कल्पना शक्ती आणि प्रतिभा दाखविण्याची संधी निर्माण केली आहे असे सांगितले. डॉ. पटारे यांनी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रगतीचा आलेख मांडला. नायडू म्हणाले की स्पर्धेमध्ये जिंकणे किंवा हरणे यापेक्षा सहभाग घेणे अधिक महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यातूनच व्यक्तिमत्वाचा आणि कौशल्यांचा खरा विकास घडतो.
जोशी म्हणाले की येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून विद्यार्थ्यांनी त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम शिकवला जातो, त्याचेच हे यशस्वी फलित आहे. तसेच संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे जिथे कुठे असतील, तेथून संजीवनीची ही यशोगाथा अभिमानाने पाहत असतील, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS