Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याचा हल्ला; युवक गंभीर जखमी 

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातील कर्मचारी तथा मंगळापूर येथील रहिवासी संजय माधव वाळे यांच्यावर रात्री बिबट्याने घराजवळ अचानक हल्ला केला असून या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. मंगळापूर येथील वाळे वस्तीवर रात्री जेवणानंतर रात्री दहाच्या सुमारास घराच्या बाहेर बसलेले असताना संजय वाळे यांच्या घराजवळ बिबट्या आला. त्याला त्यांनी दरडावून हाकलले. मात्र बिबट्याने पुन्हा माघारी येत संजय वाळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताला टाके पडले असून इतर ठिकाणी जखमा झाल्या आहेत. आरडा ओरड झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी बाहेर आली यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. यानंतर बराच रक्तस्राव झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच यशोधन कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचबरोबर माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ.सुधीर तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख  यांनी वाळे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर यशोधन मधील विविध कर्मचाऱ्यांनी त्यांना जाऊन धीर दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचारी श्रीमती कोंढार यांनी दवाखान्यामध्ये येऊन चौकशी केली. संगमनेर तालुक्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने वाढल्या असून बिबट्यांनी अनेक माणसांवर हल्ले केले आहेत यामध्ये अनेकांचा बळीही गेला आहे. जवळे कडलग येथील बालकाच्या मृत्यूनंतर बिबट्यांबाबत ठोस धोरण घ्यावे याकरता आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर प्रांत कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात आले होते.  बिबट्याला तातडीने जेरबंद करावे. विविध ठिकाणी पिंजरे लावावे अशी मागणी मंगळापुर व परिसरातील नागरिकांनी प्रशासन आणि वन विभागाकडे केली आहे.

मनोरा आमदार निवाससाठी 55.50 कोटींच्या वाढीव खर्चाला मंजुरी
उडदावणे होणार आता मधाचे गाव !शासनाकडून निवड ; ४५ लाखांचा निधी मंजूर
भाटसांगवीत जेवणाच्या कार्यक्रमात राडा; जातीवाचक शिवीगाळ करत कुकरी अन् काठ्यांनी प्राणघातक हल्ला

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातील कर्मचारी तथा मंगळापूर येथील रहिवासी संजय माधव वाळे यांच्यावर रात्री बिबट्याने घराजवळ अचानक हल्ला केला असून या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.

मंगळापूर येथील वाळे वस्तीवर रात्री जेवणानंतर रात्री दहाच्या सुमारास घराच्या बाहेर बसलेले असताना संजय वाळे यांच्या घराजवळ बिबट्या आला. त्याला त्यांनी दरडावून हाकलले. मात्र बिबट्याने पुन्हा माघारी येत संजय वाळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताला टाके पडले असून इतर ठिकाणी जखमा झाल्या आहेत. आरडा ओरड झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी बाहेर आली यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. यानंतर बराच रक्तस्राव झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेची माहिती मिळताच यशोधन कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचबरोबर माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ.सुधीर तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख  यांनी वाळे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर यशोधन मधील विविध कर्मचाऱ्यांनी त्यांना जाऊन धीर दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचारी श्रीमती कोंढार यांनी दवाखान्यामध्ये येऊन चौकशी केली.

संगमनेर तालुक्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने वाढल्या असून बिबट्यांनी अनेक माणसांवर हल्ले केले आहेत यामध्ये अनेकांचा बळीही गेला आहे. जवळे कडलग येथील बालकाच्या मृत्यूनंतर बिबट्यांबाबत ठोस धोरण घ्यावे याकरता आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर प्रांत कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात आले होते.  बिबट्याला तातडीने जेरबंद करावे. विविध ठिकाणी पिंजरे लावावे अशी मागणी मंगळापुर व परिसरातील नागरिकांनी प्रशासन आणि वन विभागाकडे केली आहे.

COMMENTS