Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागरिकांनी ५० टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा : मुंढे

शेवगाव : मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ‘१०० टक्के शास्ती माफी’ दिली जात असल्याची अफवा पसरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेवगाव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरुण मुंढे यांनी केले आहे. नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत योजनेनुसार उपलब्ध असलेल्या ५० टक्के शास्ती माफी सवलतीचाच लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. मुंढे यांनी सांगितले की, सध्या सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून १०० टक्के शास्ती माफीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. मात्र, अशी कोणतीही योजना शासन किंवा नगरपालिकेकडून लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडेच लक्ष द्यावे. नगरपालिकेकडून कर थकबाकीदारांसाठी ५० टक्के शास्ती माफीची योजना लागू असून, नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपली थकबाकी लवकरात लवकर भरावी, असेही त्यांनी आवाहन केले. वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, यामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकरिता थेट कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

शेवगाव तालुक्यातील नागलवाडीमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा; शस्त्रांचा धाक; 55 तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास
शेवगावात पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर ‘ताजनापूर’चे पाणी माळेगाव-ने व ठाकूर निमगावच्या तलावात सोडण्याची मागणी
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन’ स्पर्धेत चमक

शेवगाव : मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ‘१०० टक्के शास्ती माफी’ दिली जात असल्याची अफवा पसरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेवगाव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरुण मुंढे यांनी केले आहे. नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत योजनेनुसार उपलब्ध असलेल्या ५० टक्के शास्ती माफी सवलतीचाच लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

मुंढे यांनी सांगितले की, सध्या सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून १०० टक्के शास्ती माफीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. मात्र, अशी कोणतीही योजना शासन किंवा नगरपालिकेकडून लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडेच लक्ष द्यावे.

नगरपालिकेकडून कर थकबाकीदारांसाठी ५० टक्के शास्ती माफीची योजना लागू असून, नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपली थकबाकी लवकरात लवकर भरावी, असेही त्यांनी आवाहन केले. वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, यामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकरिता थेट कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

COMMENTS