मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग मंडळ चेंबूर या मंडळात अधीक्षक अभियंता सलीम शेख, आणि कार्यकारी अभियंता दिघावकर, तसेच उपअभिय

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग मंडळ चेंबूर या मंडळात अधीक्षक अभियंता सलीम शेख, आणि कार्यकारी अभियंता दिघावकर, तसेच उपअभियंता विजय बापट या तिन्ही अधिकार्यांनी भ्रष्टाचाराचा विक्रम केल्याचे दिसून येत आहे. कार्यकारी अभियंता दिघावकर यांच्याकडे फिल्म सिटी गोरेगाव आणि मल्टी विभागाचा पदभार असून त्यांनी फिल्म सिटी गोरेगाव येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या 33 कोटींच्या 3 निविदांमध्ये तब्बल 99 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग मंडळ चेंबूर येथील कार्यकारी अभियंंता दिघावकर यांनी फिल्म सिटी गोरेगावमध्ये रस्त्यांच्या आणि रिपेअरिंगच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे.स्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात सेव्हिंग करून आयटम कमी दाखवून मोठ्या निधींचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. सन 2022-2023, 2023-2024, आणि 2024-2025 या वर्षांमध्ये करण्यात आलेल्या कामांमध्ये स्पेशिफेकशनप्रमाणे काम न करता शासकीय निधीची लूट चालवल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्यांच्या कामांमध्ये बोगस निविदा काढून कोणतेही कामे न करता बोगस देयके अदा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेख रिपेअरिंगचे केवळ 10 टक्केच कामं झाली असतांना देखील त्याचे देयके अदा करण्यात आली आहेत. यावरून या मंडळात कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार सुररू असल्याचे दिसून येत आहे. कार्यकारी अभियंता दिघावकर आणि उप अभियंता विजय बापट यांच्याशी संगनमताने त्यांनी हा अपहार केला असून, अधीक्षक अभियंता सलीम शेख यांचा देखील त्यांना कृपाशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात कोट्यावधींचा अपहार होत असल्यामुळे याची चौकशी होण्याची खरी गरज आहे.
मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळकेंनी घ्यावी दखल
मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके कर्तव्यदक्ष असून, त्यांनी राष्ट्रीय महामार्ग मंडळ चेंबूरमध्ये कार्यकारी अभियंता दिघावकर, आणि उप अभियंता विजय बापट यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची, तसेच नियमबाह्य कामांचा धडाका लावल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अधी. अभियंता सलीम शेखचा लातुरातील भ्रष्टाचार
सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग मंडळ चेंबूर या मंडळातील अधीक्षक अभियंता यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक किस्से आहेत. चेंबूर येथे असतांना तरी ते आपली विद्यमान कारकीर्द प्रामाणिकपणे पार पाडतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी लातूरमध्ये असतांना केलेल्या भ्रष्टाचाराचा कित्ता याठिकाणी देखील गिरवतांना दिसून येत आहे, याप्रकरणी लवकरच सविस्तर वृत्तांत.

COMMENTS