Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे मनपाचा 15 हजार 669 कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यां

पुण्यातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी
दहावीच्या विद्यार्थ्यावर परीक्षा केंद्रावर कोयत्याने हल्ला

पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला. नागरिकांना दर्जेदार सुविधा, शाश्‍वत विकास आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर या अर्थसंकल्पाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहर राहण्यासाठी अधिक सुयोग्य आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प व्यक्त करत, पायाभूत सुविधांबरोबरच वाहतूक व आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल घडवण्याचे उद्दिष्ट यामध्ये मांडण्यात आले आहे.
वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा विचार करून शहरात 1 हजार विद्युत बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्याबरोबरच प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, सध्या उच्चांक गाठलेल्या प्रदूषण पातळीला लक्षणीयरीत्या कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पर्यावरणपूरक शहर उभारणीसाठी ही पावले महत्त्वाची मानली जात आहेत. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करण्यावरही या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. शहरातील बाह्यरुग्ण विभाग आणि प्रसूतिगृहांमार्फत मोफत सेवा सुरू ठेवण्यात येणार असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. बाणेर येथे उभारण्यात आलेले कर्करोग रुग्णालय लवकरच सुरू होणार असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच वारजे परिसरात बहुविशेषज्ञ रुग्णालयाचे कामही गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. मालमत्तेवर महिलांचे नाव असलेल्या कुटुंबांना 31 मार्च 2026 पर्यंत 50 टक्के करसवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS