Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणिकदौंडीला जायकवाडी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करा : पालवे

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी हा दुष्काळी व दुर्गम भाग असून या भागातील गावे ही नेहमीच दुष्काळाच्या झळा सहन करतात. पटेलवाडा तलाव सोडता कुठेही ब

माहिती अधिकाराच्या माहितीप्रकरणी आंदोलनाचा इशारा
श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे आ.अमोल खताळ यांच्या हस्ते महापूजा
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी हा दुष्काळी व दुर्गम भाग असून या भागातील गावे ही नेहमीच दुष्काळाच्या झळा सहन करतात. पटेलवाडा तलाव सोडता कुठेही बारा महीने पुरेल एवढा शाश्वत पाण्याचा स्त्रोत नसल्याने माणिकदौंडी परिसरातील गावांना जायकवाडी धरणातून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी केली.

माणिकदौंडी परिसर हा डोंगराळ व दुर्गम असल्याने या भागातील जनतेला पाण्यासाठी नेहमीच वणवण व पायपीट करावी लागते ही वस्तुस्थिती आहे. यासाठीच आपण ही मागणी केली असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी सूचना केल्या असून या पाणीपुरवठा योजनेचा आपण सतत पाठपुरावा करणार असल्याचे अविनाश पालवे यांनी सांगितले.

COMMENTS