Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वचषकाच्या उंबरठ्यावर रोनाल्डो दुखापतग्रस्त

नवी दिल्ली : आगामी फुटबॉल विश्‍वचषकाच्या पार्श्‍वभूमीवर पोर्तुगाल संघाला किरकोळ धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी आणि आघाडीचा खेळाडू  ख्रिस्तियानो रो

कोपरगावमध्ये 48 घरकुलांना मंजुरी : नगराध्यक्ष संधान
नांदेड ग्रामीण पोलीस उप विभागासाठी  मोबाईल फॉरेन्सिक  व्हॅन  उपलब्ध   
सोशल मीडियावर बदनामी पडणार महागात; राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

नवी दिल्ली : आगामी फुटबॉल विश्‍वचषकाच्या पार्श्‍वभूमीवर पोर्तुगाल संघाला किरकोळ धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी आणि आघाडीचा खेळाडू  ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा दुखापतीमुळे सराव सामन्यांपासून दूर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मेक्सिको आणि अमेरिका यांच्याविरुद्धच्या तयारीच्या लढतींसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
फेब्रुवारीच्या अखेरीपासून अल-नस्र या आपल्या क्लबकडूनही रोनाल्डो मैदानात उतरलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये काहीशी चिंता व्यक्त होत असली, तरी संघ व्यवस्थापनाने परिस्थितीवर नियंत्रण असल्याचे स्पष्ट केले आहे. पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्डोला हॅमस्ट्रिंगचा किरकोळ त्रास आहे. ही दुखापत गंभीर नसून, पुढील एक-दोन आठवड्यांत तो पूर्ण तंदुरुस्त होऊन मैदानावर परतेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. रोनाल्डोने या हंगामात आपल्या तंदुरुस्तीवर केलेले परिश्रम उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. विश्‍वचषकासाठीच्या संघरचनेबाबत बोलताना प्रशिक्षकांनी सांगितले की, अंतिम स्पर्धेत रोनाल्डोबरोबर गोंझालो रामोस हा देखील आघाडीच्या फळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अंतिम संघ निवडण्यापूर्वीचे हे शेवटचे प्रशिक्षण शिबिर असल्याने विविध पर्यायांची चाचपणी करण्यावर भर दिला जात आहे. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना संधी देऊन त्यांची क्षमता आजमावून पाहण्याची हीच योग्य वेळ असल्याचे संकेतही प्रशिक्षकांनी दिले. दरम्यान, 2026 सालचा फुटबॉल विश्‍वचषक 11 जून ते 19 जुलै या कालावधीत अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे रंगणार आहे. या स्पर्धेत पोर्तुगालचा समावेश ‘क’ गटात करण्यात आला असून, कोलंबिया आणि उझबेकिस्तान यांच्यासह त्यांचा सामना होणार आहे. या गटातील चौथा संघ प्ले-ऑफमधून निश्‍चित होणार असून, न्यू कॅलेडोनिया, जमैका किंवा काँगो प्रजासत्ताक यांपैकी एक संघ यात स्थान मिळवू शकतो.विश्‍वचषकाच्या तोंडावर रोनाल्डोची दुखापत ही चिंतेची बाब असली, तरी ती गंभीर नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोर्तुगालसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आता त्याच्या पुनरागमनाकडे आणि संघाच्या अंतिम तयारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS