जळगाव : सोन्याचे दर शनिवारी पुन्हा एकदा घसरले आहेत. जळगावात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण पाहायला मिळाली तर चांदीचे दर 600

जळगाव : सोन्याचे दर शनिवारी पुन्हा एकदा घसरले आहेत. जळगावात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण पाहायला मिळाली तर चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा संपूर्ण जगाच्या विविध क्षेत्रावर पडत आहे. जळगाव सुवर्ण नगरी मध्ये सोन्याचे दर 148000 होते.या दरात आज चार हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे दर 1,44,000 झाले आहेत.तर चांदीच्या दरात देखील सहा हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर हे 236000 वरून 230000 इतके झाले आहेत.


COMMENTS